27 डिसेंबर 2025
Created By: संजय पाटील
इंग्लंडने एशेज सीरिजमधील चौथा सामना जिंकला. इंग्लंडने ऑस्ट्रेलियावर 4 विकेट्सने विजय मिळवला.
इंग्लंडने यासह 14 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियात कसोटी सामना जिंकला. इंग्लंडने यासह भारताची बरोबरी केली.
इंग्लंड यासह इंडियासह WTC स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक सामने जिंकणारी संयुक्तरित्या दुसरी टीम ठरली.
इंग्लंडने एमसीजीमध्ये कांगारुंना पराभूत करुन 35 वा सामना जिंकला. इंग्लंडने 74 सामने खेळल्यानंतर 35 सामने जिंकले.
भारताने इंग्लंडच्या तुलनेत फार कमी सामने खेळलेत. भारताने या स्पर्धेतील 65 पैकी 35 सामने जिंकले आहेत.
WTC स्पर्धेच्या इतिहासात ऑस्ट्रेलियाने सर्वाधिक सामने जिंकलेत. ऑस्ट्रेलियाने 61 पैकी 39 सामने जिंकले आहेत.
आता टीम इंडिया आगामी कसोटी मालिकेत शुबमन गिल याच्या नेतृत्वात कशी कामगिरी करते? याकडे चाहत्यांचं लक्ष असणार आहे.