16 ऑक्टोबर 2025
Created By: संजय पाटील
भारत-ऑस्ट्रेलिया वनडे सीरिजला 19 ऑक्टोबरपासून सुरुवात होतेय. या निमित्ताने ऑस्ट्रेलियात वनडे क्रिकेटमध्ये दोन्ही संघांमधील सर्वाधिक षटकार लगावणाऱ्या फलंदाजांबाबत जाणून घेऊयात.
दोन्ही संघामधील एकूण 6 फलंदाजांनाच ऑस्ट्रेलियात एकदिवसीय क्रिकेटमध्ये 10 पेक्षा अधिक षटकार लगावता आले आहेत.
रोहित शर्माने भारत-ऑस्ट्रेलिया द्विपक्षीय मालिकेत ऑस्ट्रेलियात वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक 29 षटकार लगावले आहेत.
रोहितने ऑस्ट्रेलियात द्विपक्षीय मालिकेत सर्वाधिक धावा केल्या आहेत. रोहितने 990 धावा केल्या आहेत.
रोहितने भारत-ऑस्ट्रेलिया वनडे सीरिजमध्ये ऑस्ट्रेलियात 4 शतकं झळकावली आहेत. रोहितने आणखी 1 शतक झळकावल्यास तो स्टीव्हन स्मिथला मागे टाकेल.
रोहितनंतर दुसऱ्या स्थानी ग्लेन मॅक्सवेल आहे. मॅक्सवेलने 18 सिक्स लगावले आहेत. तर स्मिथ-सायमंड्स दोघेही 13 सिक्ससह संयुक्तरित्या तिसऱ्या स्थानी आहेत.
महेंद्रसिंह धोनी आणि एरॉन फिंच या दोघांनी प्रत्येकी 12 षटकार लगावले आहेत.
विराटची ऑस्ट्रेलियातील आकडेवारी उल्लेखनीय आहे. विराटने इथे 9 षटकारांसह एकूण 802 धावा केल्या आहेत.