भारताकडून इंग्लंडमध्ये एका मालिकेत सर्वाधिक धावा, शुबमन गिल कितव्या स्थानी?
14 जुलै 2025
Created By: संजय पाटील
इंग्लंडमध्ये एका मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम शुबमन गिल याच्या नावावर झाला आहे.
शुबमनने इंग्लंड विरूद्धच्या कसोटी मालिकेतील 3 सामन्यांत 607 धावा करत राहुल द्रविडला पछाडलं आहे.
राहुल द्रविड याने 2002 साली इंग्लंड दौऱ्यात 602 धावा केल्या होत्या. इंग्लंडमध्ये एकाच मालिकेत शुबमन आणि द्रविड या दोघांनाच 600 धावांचा टप्पा पार करता आला आहे.
या यादीत तिसऱ्या स्थानी टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली आहे. विराटने 2018 मध्ये 593 धावा केल्या होत्या.
माजी दिग्गज सुनील गावसकर यांनी 1979 च्या इंग्लंड दौऱ्यात 542 धावा कुटल्या होत्या.
'द वॉल' अर्थात राहुल द्रविड याने 2011 साली इंग्लंड विरुद्ध 461 धावा केल्या होत्या.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने 1996 साली 428 धावा केल्या होत्या.
हातात कवड्यांचं ब्रेसलेट घातल्याने काय होतं? जाणून घ्या
हातात कवड्यांचं ब्रेसलेट घातल्याने काय होतं? जाणून घ्या