अँडरसन-तेंडुलकर सीरिजमध्ये सर्वाधिक धावा, शुबमन कितव्या स्थानी?

17 जुलै 2025

Created By:  संजय पाटील

इंग्लंड-भारत यांच्यात कसोटी मालिकेतील 5 पैकी 3 सामने खेळवण्यात आले. या मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या  5 फलंदाजांबाबत जाणून घेऊयात.

या मालिकेत आतापर्यंत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम हा भारतीय कर्णधार शुबमन गिल याच्या नावावर आहे. 

शुबमन गिल याने 3 सामन्यांमध्ये 607 धावा केल्या आहेत.  

भारताचा उपकर्णधार ऋषभ पंत या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. पंतने या मालिकेतील तिन्ही सामन्यांत एकूण 425 धावा केल्या आहेत. 

या यादीत इंग्लंडचा जेमी स्मिथ तिसऱ्या स्थानी आहे. जेमीने 3 कसोटी सामन्यांमध्ये 415 धावा केल्या आहेत.

भारताचा अनुभवी फलंदाज केएल राहुल चौथ्या स्थानी आहे. केएलने 6 डावांमध्ये 375 धावा केल्या आहेत. 

भारताचा सध्याचा सर्वात अनुभवी अष्टपैलू रवींद्र जडेजा 327 धावांसह या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे.

टेस्ला नावाचा अर्थ काय? एलोन मस्कने हेच नाव का निवडलं?