IND vs SA कसोटीत सर्वाधिक धावा करणारे फलंदाज, केएल कितव्या स्थानी?

12  नोव्हेंबर  2025

Created By:  संजय पाटील

भारत-दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेत अनेक खेळाडू हे पहिल्यांदाच एकमेकांविरुद्ध खेळताना दिसणार आहेत.

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम कुणाच्या नावावर आहे?

दिग्गज आणि माजी फलंदाज सचिन तेंडुलकर याच्या नावावर भारत-दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेतील 25 सामन्यांमध्ये सर्वाधिक 1741 धावांचा विक्रम आहे.

सचिनने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 42.46 च्या सरासरीने या धावा केल्यात. तसेच सचिनने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकूण 7 शतकं झळकावली आहेत.

सचिननंतर या यादीत दक्षिण आफ्रिकेचा माजी ऑलराउंडर जॅक कॅलिस दुसऱ्या स्थानी आहे. कॅलिसने 31 डावात 7 शतकांसह 1 हजार 734 धावा केल्या आहेत.

दक्षिण आफ्रिकेचा विद्यमान कर्णधार टेम्बा बावुमा टीम इंडिया विरुद्ध सर्वाधिक धावा करणारा सक्रीय फलंदाज आहे. टेम्बाने 14 डावांत 373 रन्स केल्या आहेत.

टेम्बानंतर केएल राहुल याचा नंबर लागतो. केएलने 13 डावात 369 धावा केल्या आहेत.