कसोटीत सर्वाधिक सिक्स ठोकणारे भारतीय, पंत कितव्या स्थानी?

24 जून 2025

Created By:  संजय पाटील

ऋषभ पंत याने इंग्लंड विरूद्धच्या पहिल्या कसोटीत दोन्ही डावात शतक करुन अनेक विक्रम आपल्या नावे केले

ऋषभ पंत याने पहिल्या डावात 134 तर दुसऱ्या डावात 118 धावा केल्या. 

पंतने या दोन्ही डावात एकूण 9 षटकार लगावले. पंतने पहिल्या डावात 6 तर दुसऱ्या डावात 3 सिक्स खेचले. 

पंत यासह टेस्ट क्रिकेटमध्ये टीम इंडियासाठी सर्वाधिक सिक्स लगावणारा तिसरा फलंदाज ठरला. 

पंतच्या नावावर टेस्ट क्रिकेटमध्ये एकूण 82 सिक्सची नोंद आहे. 

या यादीत दुसऱ्या स्थानी टीम इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्मा आहे, रोहितने 88 षटकार लगावले आहेत

तर टीम इंडियासाठी टेस्टमध्ये सर्वाधिक 90 षटकारांचा विक्रम माजी फलंदाज वीरेंद्र सेहवाग याच्या नावावर आहे.

हातात कवड्यांचं ब्रेसलेट घातल्याने काय होतं? जाणून घ्या

हातात कवड्यांचं ब्रेसलेट घातल्याने काय होतं? जाणून घ्या