कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा नाबाद राहणारे भारतीय, सचिन तेंडुलकर चौथ्या स्थानी

29 जून 2025

Created By:  संजय पाटील

कसोटी क्रिकेटमध्ये भारतासाठी ईशांत शर्मा सर्वाधिक वेळा नाबाद राहिला आहे. इशांत शर्मा 105 सामन्यांमध्ये 47 वेळा नॉट आऊट राहिला आहे.

भागवत चंद्रशेखर हे 58 सामन्यांमधून 39 वेळा नाबाद परतण्यात यशस्वी ठरले आहेत. 

व्हीव्हीएस लक्ष्मण कसोटी क्रिकेटमध्ये 134 सामने खेळला. त्यापैकी तो 34 वेळा  नाबाद राहिला.

दिग्गज सचिन तेंडुलकर टीम इंडियासाठी 200 कसोटी सामने खेळला. सचिन 33 वेळा नाबाद परतला. 

द वॉल अर्थात राहुल द्रविड 163 सामन्यांमधून 32 वेळा नाबाद राहिला.

अनिल कुंबळे 132 सामन्यांमधून 32 वेळा मैदानाबाहेर नाबाद परतला.

बिशन सिंह बेदी 67 सामन्यांमधून 28 वेळा नाबाद राहण्यात यशस्वी ठरले. 

मोहम्मद शमी 64 कसोटी सामने खेळला. प्रतिस्पर्धी संघ शमीला 27 वेळा आऊट करण्यात अपयशी ठरले. 

उमेश यादवने टीम इंडियाचं 57 कसोटींमध्ये प्रतिनिधित्व केलं. उमेश 27 वेळा नॉट आऊट राहिला.

हातात कवड्यांचं ब्रेसलेट घातल्याने काय होतं? जाणून घ्या

हातात कवड्यांचं ब्रेसलेट घातल्याने काय होतं? जाणून घ्या