टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे कर्णधार, नंबर 1 कोण?

27 जून 2025

Created By:  संजय पाटील

कसोटी कर्णधार म्हणून सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम पाकिस्तानच्या इम्रान खान याच्या नावावर आहे. इम्रान खानने 48 सामन्यांमध्ये 187 विकेट्स घेतल्या आहेत.

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. पॅटने 35 सामन्यांमध्ये 140 विकेट्स घेतल्या आहेत.

ऑस्ट्रेलियाचे दिग्गज रिची बेनॉड तिसर्‍या स्थानी आहेत.त्यांनी 28 सामन्यांमध्ये 138 विकेट्स मिळवल्या.

विंडीजचे दिग्गज गॅरी सोबर्स यांनी 39 सामन्यांमध्ये 111 फलंदाजांना बाद केलं होतं.

न्यूझीलंडच्या डॅनियल व्हीटोरी याने 32 सामन्यांमध्ये 116 विकेट्स मिळवल्या आहेत.

टीम इंडियाचे दिग्गज कपिल देव यांनी कर्णधार म्हणून कसोटीत 34 सामन्यांमध्ये 111 विकेट्स घेतल्या होत्या.

पाकिस्तानच्या वसीम अक्रमने कर्णधार म्हणून 25 टेस्ट मॅचेसमध्ये 107 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.

भारताचे माजी कर्णधार राहिलेले बिशनसिंह बेदी यांनी कॅप्टन म्हणून 22 सामन्यांमध्ये 106 विकेट्स घेतल्या होत्या. 

हातात कवड्यांचं ब्रेसलेट घातल्याने काय होतं? जाणून घ्या

हातात कवड्यांचं ब्रेसलेट घातल्याने काय होतं? जाणून घ्या