महेंद्रसिंह धोनी याचा मोठा कारनामा, अशी कामगिरी करणारा ठरला चौथा भारतीय फलंदाज
20 मे 2025
Created By: संजय पाटील
चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने इतिहास घडवला आहे
महेंद्रसिंह धोनी याने टी 20 क्रिकेटमध्ये 350 सिक्स पूर्ण केले आहेत. धोनी अशी कामगिरी करणारा चौथा भारतीय फलंदाज ठरला आहे.
धोनीने अरुण जेटली स्टेडियममध्ये 20 मे रोजी राजस्थान रॉयल्स विरुद्ध ही कामगिरी करुन दाखवली
धोनीने आयपीएल कारकीर्दीत आतापर्यंत एकूण 264 षटकार लगावले आहेत, तसेच धोनीने 404 टी 20 सामन्यांत 350 सिक्सचा टप्पा पार केला आहे
भारतीय फलंदाजांच्या यादीत रोहित शर्मा 542 सिक्स, विराट कोहली 434 सिक्स तर सूर्यकुमार यादव याने 368 षटकार लगावले आहेत.
धोनीने टी20 कारकीर्दीत 37 च्या सरासरीने 7 हजार 620 धावा केल्या आहेत. धोनीने या दरम्यान 28 अर्धशतकं झळकावली आहेत.
तसेच धोनीने टी 20I क्रिकेटमध्ये टीम इंडियाचं 98 सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं. धोनीने या दरम्यान 52 षटकार लगावले होते.
हातात कवड्यांचं ब्रेसलेट घातल्याने काय होतं? जाणून घ्या
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा