नुकताच बोहल्यावर चढलेला हा खेळाडू आफ्रिकेसाठी ठरणार डेंजरस  ?

30 November 2023

Created By : Manasi Mande

भारतीय संघ लवकरच साऊथ आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे.

या दौऱ्यात भारतीय संघ टी 20, वनडे आणि कसोटी मालिका खेळणार आहे.  

या दौऱ्यासाठी संघाची लवकरच घोषणा होणार असून पाचवा गोलंदाज म्हणून मुकेश कुमारची निवड होऊ शकते.

त्याचे नुकतेच लग्न झाले आहे. त्यासाठी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सीरिजमधून सुट्टी घेतली होती. 

दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी त्याची निवड झाल्यास तो मुकेश कुमारचा पहिला परदेश दौरा असेल.

त्याला संधी मिळाली तर तो पहिल्यांदाच लाल चेंडू घेऊन दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांचा धुव्वा उडवण्यास सज्ज होईल.