18 नोव्हेंबर 2025
Created By: संजय पाटील
भारताचा दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात पराभव झाला. दक्षिण आफ्रिकेने भारतावर 30 धावांनी मात केली. आता दुसरा कसोटी सामना हा गुवाहाटीत होणार आहे.
भारताचा कसोटी कर्णधार शुबमन गिल गुवाहाटीत खेळू शकणार की नाही? याबाबत अनिश्चितता आहे.
शुबमनला दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटीला मुकावं लागल्यास त्याच्या जागी नितीश कुमार रेड्डी याला संधी मिळू शकते.
नितीश कुमार याचा गुवाहाटीत होणाऱ्या दुसर्या कसोटी सामन्यासाठी शुबमनच्या जागी समावेश केला जाऊ शकतो.
नितीश कुमार रेड्डी याने आतापर्यंत 9 कसोटी सामन्यांमध्ये 29.69 च्या सरासरीने 386 धावा केल्या आहेत.
नितीश कुमार रेड्डी याने ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कसोटी मालिकेत एकमेव मात्र अविस्मरणीय शतक केलं होतं.
दरम्यान टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरा आणि अंतिम कसोटी सामना 22 नोव्हेंबरपासून होणार आहे.