शाई होपचा कारनामा, सचिनला पछाडलं, वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक

19  नोव्हेंबर  2025

Created By:  संजय पाटील

विंडीजचा कर्णधार शाई होप याने न्यूझीलंड विरुद्ध दुसऱ्या सामन्यात शतक झळकावलं. शाईने 69 बॉलमध्ये 109 रन्स केल्या.

शाईने शतकासह वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. शाई 12 वेगवेगळ्या संघाविरुद्ध एकदिवसीय शतक करणारा एकमेव फलंदाज ठरला आहे. 

शाईने यासह सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. सचिनने 11 संघांविरुद्ध शतक झळकावले होते.

शाईने भारत-बांगलादेश विरुद्ध प्रत्येकी 3-3, इंग्लंड-श्रीलंका-पाकिस्तान विरुद्ध प्रत्येकी 2-2, दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान आणि न्यूझीलंडसह 12 संघांविरुद्ध 19 शतक झळकावली आहेत. 

शाईने दिग्गज ब्रायन लारालाही पछाडलं. शाईने 142 डावात 19 एकदिवसीय शतकं केली आहेत. तर लाराला 19 शतकांसाठी 285 एकदिवसीय डावात बॅटिंग करावी लागली.

शाई विंडीजसाठी वेगवान 19 एकदिवसीय शतकं करणारा पहिला फलंदाज आहे. शाईने सर्वात कमी 102 डावांत 19 एकदिवसीय शतकं झळकावली आहेत.

शाईने 142 डावांत 6 हजार धावा केल्या. शाईआधी लाराने ही कामगिरी केली होती. तर दिग्गज व्हीव्हीयन रिचर्ड्स यांनी 141 डावांत अशी कामगिरी केली होती.