16 वर्षांच्या कारकीर्दीत पहिलचं अर्धशतक, कोण आहे तो?

7 डिसेंबर  2025

Created By:  संजय पाटील

न्यूझीलंड-विंडीज पहिला कसोटी सामना ख्राईस्टचर्चमधील हेगले ओव्हल इथे पार पडला.

न्यूझीलंडने विजयासाठी दिलेल्या 531 धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजने तीव्र प्रतिकार करत चिवट फलंदाजी केली.

आठव्या स्थानी बॅटिंगसाठी आलेल्या केमार रोच याने जबरदस्त कामगिरी केली. केमारने चिवट बॅटिंग केली.

केमार रोच विंडीजच्या अनुभवी खेळाडूंपैकी एक आहे. केमारने या सामन्यात झुंजार अर्धशतक झळकावलं. केमारने यासह खास कामगिरी केली.

केमारने 2009 साली कसोटी पदार्पण केलं होतं. केमारला तेव्हापासून इतकी वर्ष अर्धशतक करता आलं नाही.

मात्र केमारने 16 वर्षानंतर आणि अगदी निर्णायक क्षणी झुंजार अर्धशतकी खेळी केली.

केमारचा याआधी कसोटीत 47 हा हायस्कोअर होता. केमारने 86 कसोटीत 1200 धावा केल्या आहेत.