पाकिस्तानच्या खेळाडूचं वजन कमी न करण्यामागील अजब कारण, म्हणाला...

29 ऑगस्ट 2025

Created By:  संजय पाटील

पाकिस्तानचा क्रिकेटपटू आझम खान याला कायम त्याच्या शरीर आणि वजनामुळे ट्रोल केलं जातं. 

आझम खान वाढीव वजनानंतरही पाकिस्तानसाठी काही सामन्यांमध्ये खेळला आहे. तसेच तो अनेक लीग स्पर्धेतही खेळतो.

आझम खानची शरीरयष्टी पाहता त्याची कोणत्या आधारावर संघात निवड केली जाते? असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांकडून उपस्थित केला जातो.

इतक्या टीकांनंतरही आझम वजन कमी करु शकला नाहीय. आझमनुसार, सातत्याने क्रिकेट खेळणं हे वजन कमी न करण्यामागील कारण आहे. 

वजन कमी करणं हे 1-2 आठवड्यात होणारं काम नाही. त्यासाठी वेळ हवा.  4-5 वर्षांपासून सातत्याने खेळतोय, असं कारण आझमने दिलं.

बिजी शेड्यूलमुळे फिटनेसकडे लक्ष द्यायला वेळ नसल्याचंही आझम खान याने म्हटलं आहे. 

आझम खान हा पाकिस्तानचे माजी कर्णधार आणि विकेटकीपर मोईन खान यांचा मुलगा आहे.

आशिया कप पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक निर्धाव चेंडू टाकणारे गोलंदाज