सध्या स्टार  क्रिकेटपटूंच्या घरी  छोट्या पाहुण्यांच  आगमन होतय. 

विराट कोहली दुसऱ्यांदा  पिता बनला, तर केन  विलियमसन तिसऱ्यांदा  पिता बनला.

आता शोएब अख्तरच्या घरी सुद्धा छोट्या पाहुणीच आगमन झालय.

1 मार्चला शोएबच्या पत्नीने मुलीला जन्म दिला. त्याने सोशल मीडियावरुन  माहिती दिली.

मिकाईल आणि मुजद्दिद या शोएबच्या दोन मुलांना  बहिण मिळाली. तिच नाव  नूर अली अख्तर आहे.

48 वर्षांचा शोएब तिसऱ्यांदा पिता बनलाय. त्याने  मित्राच्या मुलीबरोबर  लग्न केलं.

शोएबने 2014 साली रुबाब खानसोबत निकाह केला.  ती शोएब पेक्षा 19 वर्षांनी  लहान आहे.