17 ऑगस्ट 2025
Created By: संजय पाटील
आशिया कप 2025 स्पर्धेला 9 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. पाकिस्तानने या स्पर्धेसाठी 17 सदस्यीय संघ जाहीर केला आहे.
पीसीबीने यंदा युवा खेळाडूंवर विश्वास दाखवला आहे. निवड समितीने 17 सदस्यीय संघात अशा 5 खेळाडूंना संधी दिलीय जे याआधी या स्पर्धेत खेळले नाहीत.
ओपनर बॅट्समन सॅम अय्यूब याला आशिया कप स्पर्धेत पहिल्यांदाच संधी देण्यात आली आहे. सॅमला 36 टी 20i सामन्यांचा अनुभव आहे. सॅमने आतापर्यंत टीम इंडिया विरुद्ध एकही सामना खेळलेला नाही.
फिरकीपटू अबरार अहमद याचीही आशिया कप स्पर्धेत पहिल्यांदाच निवड करण्यात आली आहे. अबरारने 14 टी 20 सामन्यांमध्ये 17 विकेट्स घेतल्या आहेत.
स्पिनर सुफीयान मुकीम हा देखील पाकिस्तान संघाचा भाग आहे. सुफीयान याने 13 टी 20i सामन्यांमध्ये 21 विकेट्स घेतल्या आहेत.
युवा फलंदाज हसन नवाज यानेही निवड समिताला आशिया कप स्पर्धेत संधी देण्यास भाग पाडलं आहे. हसनने 14 टी 20i सामन्यांमध्ये 339 धावा केल्या आहेत.
साहिबजादा फरहान याचीही आशिया कप स्पर्धेत खेळण्याची पहिलीच वेळ ठरणार आहे. फरहान पाकिस्तानसाठी 15 टी 20i सामने खेळला आहे. फरहानने 3 अर्धशतकांसह 315 धावा केल्यात.