25 नोव्हेंबर 2025
Created By: संजय पाटील
पाकिस्तान सध्या मायदेशातील टी 20i ट्राय सीरिजच्या फायनलध्ये पोहचली आहे. पाकिस्तानसमोर अंतिम फेरीत झिंबाब्वे किंवा श्रीलंकेचं आव्हान असणार आहे.
पाकिस्तानचा कर्णधार सलमान आघा याने या मालिकेत वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक केलाय. सलमानने तिघांना मागे टाकलंय.
सलमान एका वर्षात सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा खेळाडू ठरला आहे. याआधी हा विक्रम संयुक्तरित्या तिघांच्या नावावर होता.
सलमानने 2025 या वर्षात आतापर्यंत 54 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. सलमान पाकिस्तानचा प्रमुख खेळाडू आहे.
सलमानआधी राहुल द्रविड, महेंद्रसिंह धोनी आणि मोहम्म्द युसूफ या तिघांनी एका वर्षात प्रत्येकी 53-53 सामने खेळले होते.
सलमान आघा याने 54 सामन्यांमध्ये 1 हजार 492 धावा केल्या आहेत.
सलमानने या 54 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 2 शतकं आणि 8 अर्धशतकं झळकावली आहेत.