बाबार आझम आणि पाकिस्तानी अभिनेत्रीच्या प्रेमाच्या चर्चांना उधाण

14 November 2023

Created By: Chetan Patil

पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझम यांचं नाव एका पाकिस्तानी अभिनेत्रीशी जोडलं जातंय

बाबरचं नाव पाकिस्तानची प्रसिद्ध अभिनेत्री शुमार हानिया आमिर हिच्यासोबत जोडलं जातंय.

सोशल मीडियावर दोघं एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा आहे. दोघांच्या चाहत्यांना आनंदाचा पाराच राहिलेला नाही.

एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओत बाबार आझम आणि शुमार हानिया यांची क्लिप आहे. यातला पहिला व्हिडीओ शुमार हानिया यांच्यापासून सुरु होतो.

एका टीव्ही कार्यक्रमात शुमार हानिया यांना प्रश्न विचारला जातो की, कोणता क्रिकेटर तुम्हाला तुमच्यापेक्षा जास्त क्यूट वाटतो?

यासाठी हानियाला नसीम शाह आणि बाबार आझम असे दोन ऑप्शन दिले जातात. हानिया बाबर आझमची निवड करते

दुसरा व्हिडीओ बाबर आझमचा आहे. बाबरला पाकिस्तानच्या टॉप तीन अभिनेत्रींपैकी कुणासोबत चित्रपट करायला आवडेल? असा प्रश्न विचारला जातो. यावेळी बाबर शुमार हानिया हिचं नाव घेतो.

याबाबतच्या चर्चा व्हायरल झाल्यानंतर हानियाने सोशल मीडियावर बाबर आपला भाऊ असल्याचं म्हटलं आहे