पाकिस्तानी क्रिकेटर हार्दिकचा जबरा फॅन, पंड्याची स्टाईल कॉपी

9 नोव्हेंबर  2025

Created By:  संजय पाटील

पाकिस्तानने हाँगकाँग आंतरराष्ट्रीय सिक्सेस 2025 स्पर्धेचं विजेतेपद मिळवलं. पाकिस्तानने कुवेतला पराभूत करत सहाव्यांदा या ट्रॉफीवर नाव कोरलं. 

अब्बास अफ्रीदी याच्या नेतृत्वात पाकिस्तानने ही कामगिरी केली. पाकिस्तानी खेळाडूंनी विजयानंतर जल्लोष केला.

पाकिस्तानी खेळाडूने विजयाचा आनंद साजरा करताना टीम इंडियाचा ऑलराउंडर हार्दिक पंड्या याची पोज कॉपी केली.  

पाकिस्तानच्या संपूर्ण संघाने हार्दिक पंड्याच्या स्टाईलमध्ये ट्रॉफीसह सेलीब्रेशन केलं. यावरुन पंड्याची किती क्रेझ आहे, हे स्पष्ट होतं.

हार्दिकने टी 20i वर्ल्ड कप आणि आशिया कप 2025 विजयानंतर त्याच्या नेहमीच्या अंदाजात ट्रॉफीसह सेलीब्रेशन केलं होतं.

मुहम्मद शहजाद याने फायनलमध्ये 4 रन्स केल्या. तसेच 1 विकेट मिळवली. 

पाकिस्तानने या सामन्यात कुवेतसमोर 136 धावांचं आव्हान ठेवलं. मात्र कुवेतने 5.1 ओव्हर ऑलआऊट 92 रन्स केल्या.