महिलेला बुक्का मारला, दरोडा घातला, आता क्रिकेटरला अशी शिक्षा

29 नोव्हेंबर  2025

Created By:  संजय पाटील

पापुआ न्यू गिनी क्रिकेट टीमचा विकेटकीपर किपलीन डॉरिगा याला दरोडा घातल्या प्रकरणी शिक्षा सुनावण्यात आली आहे. 

किपलीन डॉरिगा याला 3 वर्षांसाठी कारावासाची शिक्षा सुनावण्यात आलीय.

किपलीन गेल्या 3 महिन्यांपासून ताब्यात होता. मात्र आता त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. किपलीन दरोडा टाकण्याआधी एका महिलेला बुक्का मारला होता.

किपलीनने 27 ऑगस्टला आपला गुन्हा मान्य केला. मात्र किपलीनला 28 नोव्हेंबरला शिक्षा सुनावण्यात आली.

किपलीनने पीएनजी टीमचं 39 वनडे आणि 43 टी 20i सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. किपलीनने पीएनजीसाठी 4 अर्धशतकं झळकावली आहेत.

किपलीनच्या नावावर एका टी 20i सामन्यात सर्वाधिक 5 कॅच घेण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड आहे.

किपलीनने एका वनडे सीरिजमध्ये 200 धावा आणि विकेटकीपर म्हणून 10 फलंदाजांना बाद केलं आहे. हा एक रेकॉर्ड आहे.