दक्षिण आफ्रिकेच्या क्विंटन डी कॉकचा कारनामा, एका शतकासह काय काय केलं?

7 डिसेंबर  2025

Created By:  संजय पाटील

क्विंटन डी कॉक याने टीम इंडिया विरुद्धच्या तिसऱ्या वनडेत शानदार शतक झळकावलं.

क्विंटनने विशाखापट्टणममध्ये तिसऱ्या सामन्यात  88 बॉलमध्ये 106 धावा केल्या.

क्विंटनने या शतकी खेळीत 8 चौकार आणि 6 षटकार लगावले. क्विंटनने यासह खास कामगिरी केली.

क्विंटनच्या कारकीर्दीतील हे 23 वं शतक ठरलं. क्विंटन यासह सर्वाधिक शतक करण्याबाबत 10 वा फलंदाज ठरला.

क्विंटनने इंडियाविरुद्ध 7वं वनडे शतक ठोकत सनथ जयसूर्याच्या विक्रमाची बरोबरी केली. डीकॉकने 23 डावात ही कामगिरी केली. तर जयसूर्याने 85 व्या डावात सातवं शतक केलं होतं.

तसेच क्विंटन विकेटकीपर म्हणून कोणत्याही एका संघाविरुद्ध सर्वाधिक एकदिवसीय शतक करणारा पहिला फलंदाज ठरला. कॉकने गिलख्रिस्ट याच्या 6 शतकांचा विक्रम मोडला

तसेच क्विंटनने विकेटकीपर म्हणून सर्वाधिक एकदिवसीय शतकांच्या विक्रमाची बरोबरी केली. क्विंटन आणि संगकाराच्या नावावर प्रत्येकी 23-23 शतकं आहेत.