वैभव सूर्यवंशी याचा कारनामा, IPL 2025 मधील नंबर 1 बॅट्समन

23  मे 2025

Created By:  संजय पाटील

राजस्थान रॉयल्सचा  वैभव सूर्यवंशी याने IPL 2025 मधील शेवट शानदार केला. वैभवने राजस्थानच्या साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात  अर्धशतक झळकावलं

वैभव सूर्यवंशी याने आयपीएल 2025 मधून पदार्पण केलं. वैभवने पदार्पणातील हंगामात उल्लेखनीय कामगिरी केली. वैभवने 7 सामन्यांमध्येच क्रिकेट विश्वाला दखल घेण्यास भाग पाडलं

वैभवने या हंगामात अवघ्या 35 चेंडूत शतक झळकावत इतिहास घडवला. वैभवने 7 सामन्यांमध्ये 1 शतक 1 अर्धशतकासह 36 च्या  सरासरीने 252 रन्स केल्या.

वैभवचा स्ट्राईक रेट उल्लेखनीय राहिला.  वैभवचा स्ट्राईक रेट इतर फलंदाजांच्या तुलनेत सरस.

वैभवने 206.55 च्या स्ट्राईक रेटने 252 रन्स केल्या. वैभवचा हा स्ट्राईक रेट 20 किंवा त्यापेक्षा जास्त बॉल खेळणाऱ्या  97 फलंदाजांपेक्षा जास्त आहे. 

या यादीत लखनौचा स्फोटक फलंदाज निकोलस पूरन दुसऱ्या स्थानी आहे. पूरनचा स्ट्राईक रेट हा 197.82 असा आहे. 

आरसीबीचा फिनीशर  टीम डेव्हिड याचा स्ट्राईक रेट हा 193.75 असा आहे. टीम या यादीत तिसऱ्या स्थानी आहे.

हातात कवड्यांचं ब्रेसलेट घातल्याने काय होतं? जाणून घ्या