जडेजाला दिग्गज गॅरी सोबर्स यांना पछाडण्याची संधी, ऑलराउंडर रेकॉर्ड ब्रेक करणार?
18 जुलै 2025
Created By: संजय पाटील
इंग्लंड विरुद्ध इंडिया यांच्यातील चौथा कसोटी सामना हा मँचेस्टरमध्ये खेळवण्यात येणार आहे.
टीम इंडियाचा स्टार ऑलराउंडर रवींद्र जडेजाला इंग्लंडमध्ये मोठा विक्रम मोडीत काढण्याची संधी आहे.
जडेजाने आतापर्यंत इंग्लंडमध्ये सहा ते त्याखालील क्रमांकावर फलंदाजी करताना एकूण 863 धावा केल्या आहेत.
जडेजाकडे उर्वरित 2 सामन्यांमध्ये दिग्गज माजी अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांना पछाडण्याची संधी आहे.
इंग्लंडमध्ये सहाव्या आणि त्याखाली बॅटिंग करताना सर्वाधिक धावांचा विक्रम सर गॅरी सोबर्स यांच्या नावावर आहे.
गॅरी सोबर्स यांनी इंग्लंडमध्ये 16 डावांत 1 हजार 97 धावा केल्या होत्या.
जडेजाने इंग्लंडमधील 23 डावांत 863 धावा केल्या आहेत.
तर जडेजाला रेकॉर्ड ब्रेक करण्यासाठी 2 सामन्यांमध्ये 235 धावांची गरज आहे.
टेस्ला नावाचा अर्थ काय? एलोन मस्कने हेच नाव का निवडलं?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा