Stampede : खेळाडूंना मालामाल करणारी RCB मृत चाहत्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करणार?
4 जून 2025
Created By: संजय पाटील
आयपीएल विजेत्या RCBच्या खेळाडूंचा एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये सत्कार करण्यात आला. दुसऱ्या बाजूला स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरीत 10 जणांचा मृत्यू झाला
स्टेडियमची क्षमता 30-35 हजारांची होती. मात्र 2-3 लाख चाहते आले. त्यामुळे जमलेली गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज करण्यात आला.
पोलिसांच्या लाठीचार्ज दरम्यान ही चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत 10 जणांना आपल्या जीवाला मुकावं लागलं.
दुर्घटनेच्या काही तासांनी आरसीबीने निवेदनद्वारे मृत कुटुंबियांच्या दु:खात सामील असल्याचं म्हटलं. मात्र मृतांच्या कुटुंबियांसाठी आर्थिक मदत जाहीर केली नाही.
आरसीबीने आतापर्यंत अनेक खेळाडूंना कोट्यधीश केलंय. मात्र आता Rcb मृत चाहत्यांच्या कुटुंबियांसाठी आर्थिक मदत करण्याबाबत फेरविचार करावा, असं म्हटलं जात आहे.
आरसीबी खेळाडूंसाठी कोटी रुपये सहज खर्च करते. मात्र त्यांचा प्राण असलेल्या चाहत्यांसाठी अशा परिस्थितीत आरसीबी मनाचा मोठेपणा दाखवणार का? याकडे चाहत्यांचं लक्ष असेल.
दरम्यान आरसीबीने निवदेनाद्वारे चाहत्यांनी काळजी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलंय.
हातात कवड्यांचं ब्रेसलेट घातल्याने काय होतं? जाणून घ्या