ऋषभ पंतची मोठी कामगिरी, रोहितच्या विक्रमाची बरोबरी
13 जुलै 2025
Created By: संजय पाटील
ऋषभ पंत याने इंग्लंड विरूद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात अर्धशतक झळकावलं
ऋषभ पंतने लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडमध्ये 112 चेंडूत 74 धावा केल्या.
पंतच्या या खेळीत 8 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. पंतने यासह रोहितच्या विक्रमाची बरोबरी केली.
पंत या 2 सिक्ससह टीम इंडियासाठी टेस्टमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारा संयुक्तरित्या दुसरा फलंदाज ठरला आहे.
ऋषभ पंत याने 80 डावात 88 षटकार लगावले आहेत.
रोहित शर्मा याने त्याच्या कसोटी कारकीर्दीत 116 डावांत 88 षटकार ठोकले होते.
टीम इंडियासाठी कसोटीत सर्वाधिक 90 षटकारांचा (178 डाव) विक्रम वीरेंद्र सेहवाग याच्या नावावर आहे.
हातात कवड्यांचं ब्रेसलेट घातल्याने काय होतं? जाणून घ्या
हातात कवड्यांचं ब्रेसलेट घातल्याने काय होतं? जाणून घ्या
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा