विदेशात 1 कसोटी सामन्यात 2 शतकं करणारे भारतीय
23 जून 2025
Created By: संजय पाटील
टीम इंडियाचा उपकर्णधार आणि विकेटकीपर ऋषभ पंत याने इंग्लंड विरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील दोन्ही डावात शतकी खेळी केली.
ऋषभ पंत विदेशात एका कसोटीतील दोन्ही डावात शतक करणारा पाचवा भारतीय फलंदाज ठरला आहे.
भारतासाठी विजय हजारे यांनी सर्वात आधी 1948 साली एडलेडमध्ये ही कामगिरी केली होती. हजारेंनी 116 आणि 145 धावा केल्या होत्या.
त्यानंतर लिटिल मास्टर यांनी सलग 2 वेळा टीम इंडियासाठी ही कामगिरी केली. गावसकरांनी 1971 आणि 1978 मध्ये हा कारनामा केला.
गावसकरांनी 1971 साली पोर्ट ऑफ स्पेनमध्ये 124 आणि 220 धावांची खेळी केली. तर 1978 मध्ये कराचीत 111 आणि 137 रन्स केल्या.
राहुल द्रविडने हॅमिल्टनमध्ये 1999 साली 190 आणि नाबाद 103 धावा केल्या.
त्यानंतर विराट कोहली याने अखेरीस विदेशात भारतासाठी 2014 साली ही कामगिरी केली. विराटने एडलेमध्ये 115 आणि 141 रन्स केल्या.
त्यानतंर आता ऋषभ पंतने 11 वर्षांनंतर लीड्समध्ये 134 आणि 118 धावा केल्या.
हातात कवड्यांचं ब्रेसलेट घातल्याने काय होतं? जाणून घ्या
हातात कवड्यांचं ब्रेसलेट घातल्याने काय होतं? जाणून घ्या
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा