5 जुलै 2025
Created By: राकेश ठाकुर
बर्मिंगहॅम कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात शानदार अर्धशतक झळकावून पंतने इतिहास रचला आहे.
बर्मिंगहॅम कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतने 58 चेंडूत 65 धावा केल्या.
अर्धशतकी खेळी करताना ऋषभ पंतने 8 चौकार आणि 3 षटकारही मारले.
पंतने 45 कसोटी सामन्यांमध्ये 86 षटकार पूर्ण केले आहेत. या शर्यतीत महेंद्रसिंग धोनीला मागे टाकले.
रोहितच्या नावावर 88, तर सेहवागच्या नावावर 90 षटकार आहेत. पंत या मालिकेत दोघांचाही विक्रम मोडू शकतो.
पंतने इंग्लंडच्या भूमीवर 23 षटकार मारले आहेत. कसोटी क्रिकेट इतिहासात परदेशी भूमीवर सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम ऋषभ पंतच्या नावावर आहे.
लीड्स कसोटी सामन्यात ऋषभ पंतने पहिल्या डावात 134 धावा केल्या. तर दुसऱ्या डावात त्याने 118 धावा केल्या.