29 ऑक्टोबर 2025
Created By: संजय पाटील
भारतीय खेळाडूंचा क्रिकेट वर्तुळात दबदबा आहे. तिन्ही फॉर्मेटमध्ये भारतीय खेळाडूंनी आपला ठसा उमटवला आहे.
भारताच्या 5 खेळाडूंनी 3 वेगवेगळ्या फॉर्मेटमध्ये अव्वल स्थान पटकावलं आहे.
रोहित शर्मा नंबर 1 वनडे बॅट्समन ठरला आहे. रोहितने कॅप्टन शुबमन गिल याला मागे टाकलं आहे.
अभिषेक शर्मा टी 20i क्रिकेटमध्ये फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानी कायम आहे.
मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्थी हा टी 20i रँकिंगमध्ये पहिल्या स्थानी आहे. वरुण सातत्याने चमकदार कामगिरी करत आहे.
यॉर्करकिंग जसप्रीत बुमराह याने टेस्ट बॉलिंग रँकिंगमध्ये आपला दबदबा कायम ठेवला आहे. बुमराह नंबर 1 बॉलर आहे.
रवींद्र जडेजा टेस्ट क्रिकेटमधील नंबर 1 ऑलराउंडर आहे. जडेजाने टेस्टमध्ये बॅटिंग, बॉलिंगसह फील्डिंगमध्येही उल्लेखनीय कामगिरी केली आहे.