27 ऑक्टोबर 2025
Created By: संजय पाटील
भारताने ऑस्ट्रेलियाला तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यात पराभूत केलं. रोहित शर्मा या विजयाचा हिरो ठरला.
रोहितने मालिकेतील शेवटच्या सामन्यात नाबाद शतक झळकावलं. रोहितचं हे आतंरराष्ट्रीय कारकीर्दीतील 50 वं शतक ठरलं.
रोहितने निवृत्तीच्या चर्चेदरम्यान नाबाद 121 धावांची खेळी केली. रोहितने या मालिकेत एकूण 202 धावा केल्या.
रोहितला या कामगिरीसाठी मॅन ऑफ द मॅच आणि मॅन ऑफ द सीरिज या पुरस्काराने गौरवण्यात आलं.
रोहित मॅन ऑफ द सीरिज जिंकणारा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला. रोहितने याबाबतीत महेंद्रसिंह धोनीचा रेकॉर्ड ब्रेक केला.
रोहित वयाच्या 38 वर्ष 178 व्या दिवशी मालिकावीर ठरला. तर धोनीने 37 वर्ष 194 व्या दिवशी मॅन ऑफ द सीरिज जिंकली होती.
तसेच रोहित या मालिकेत सर्वाधिक 5 षटकार, 21 चौकार, 2 अर्धशतकं आणि 1 शतक करणारा एकमेव फलंदाज ठरला.