2 सप्टेंबर 2025
Created By: संजय पाटील
क्रिकेट विश्वासाठी आणि चाहत्यांसाठी 2025 हे वर्ष वेदना देणारं ठरलं. या वर्षात आतापर्यंत एकूण 20 खेळाडूंनी निवृत्ती जाहीर केली.
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क याने टी 20i क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. स्टार्कची टी 20i कारकीर्द 13 वर्षांची राहिली.
मिचेल स्टार्क याच्याआधी काही दिवसांपूर्वी भारताचा अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा याने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली.
मार्टिन गुप्टील, तमीम इक्बाल, वरुण एरॉन, शापूर जादरान, रिद्धीमान साहा, दिमुथ करुणारत्ने, हेनरिक क्लासेन, पीयूष चावला, पूरन, महमूदुल्लाह आणि आंद्रे रसेल यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला.
2025 वर्षात भारताच्या 2 दिग्गजांसह श्रीलंकेच्या एकाने अशा एकूण 3 खेळाडूंनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
रोहित शर्मा, विराट कोहली आणि अँजलो मॅथ्यूज या तिघांनी कसोटी क्रिेकटला रामराम ठोकला
तसेच मार्कस स्टोयनिस, ग्लेम मॅक्सवेल, स्टीव्हन स्मिथ आणि मुश्फिकुर रहीम यांनी वनडे क्रिकेटमधून रिटायरमेंट घेतली.