सोशल मीडियावर सारा तेंडुलकरच्या हातात असलेल्या बॅगेची  चर्चा सुरु आहे.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा कुठल्या स्टाइल आयकॉनपेक्षा कमी नाहीय. फॅन्सही  तिच खूप कौतुक करतात. 

सारा तेंडुलकर तिच सौंदर्य आणि स्टाइलमुळे सोशल मीडियावर भरपूर व्हायरल होते. तिच्या लुक्सची पण चर्चा होते. 

साराचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. त्यात तिच्या हातात लाखोंची हँडबॅग आहे.

साराच्या हातातील हँडबॅग LOEWE लग्जरी कंपनीच्या नावाची आहे. ही स्पेनची  कंपनी आहे. 

कंपनी वेबसाइटनुसार, मिनी बॅगची किंमत 1 लाख रुपये, तर मोठ्या हँडबॅगची किंमत 1 लाख 92 हजार आहे. 

सारा तेंडुलकरच्या सौंदर्यासमोर बॉलिवूड अभिनेत्री सुद्धा फिक्या ठरतात. वेस्टर्न ड्रेसमध्ये तिचा कमालीचा लूक आहे.