वर्षभरापासून सर्व गुपचुप सुरु होतं, साराने अखेर सांगितलंच, जाणून घ्या
8 ऑगस्ट 2025
Created By: संजय पाटील
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याची लेक सारा तेंडुलकर सोशल मीडियावर कायम चर्चेत असते.
सारा तेंडुलकर तिच्या सौंदर्याव्यतिरिक्त फिटनेसमुळेही फॉलोवर्समध्ये चर्चेत असते.
साराने स्वत:नंतर आता दुसर्यांना फिट करण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
साराने एका नव्या बिजनेसची सुरुवात केली आहे. साराने मुंबईत फिटनेस स्टुडिओची सुरुवात केलीय.
साराने दुबईतील प्रसिद्ध पिलाटीस अॅकेडमीसह भागीदारीत या स्टुडिओची सुरुवात केली आहे. साराने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे.
गेल्या वर्षभरापासून या प्रोजेक्टवर गुपचुप काम सुरु होतं, असं साराने एका पत्रात म्हटलं आहे.
साराने तिची मैत्रीण अंजली चंदीरमानी आणि पिलाटीस अॅकेडमीची मालकीण क्लोई के यांच्यासह या नव्या बिजनेसची सुरुवात केली आहे.
नात्यात बेंचिंगचे नवे फॅड काय? ट्रेंडचे फायदे-तोटे जाणून घ्या
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा