25 ऑगस्ट 2025
Created By: राकेश ठाकुर
रेडिटने सचिन तेंडुलकरला नवा ग्लोबल ब्रँड अम्बेसडर करण्याची घोषणा केली आहे. यावेळी त्याची रेडिट पोस्ट खूपच व्हायरल होत आहे.
रेडिट आस्क मी एनिथिंग सेशनचं आयोजन केलं होतं. तेव्हा सचिनने चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरं दिली.
सेशन सुरु असताना एका चाहत्याला शंका आली. खरंच सचिन आहे की नाही? तेव्हा सचिने त्याला मजेशीर उत्तर दिलं.
सचिनने चाहत्याला उत्तर देताना एक फोटो पोस्ट केला. तसेच 'आता आधार पण पाठवू का?' अशी पोस्ट लिहिली.
सचिन तेंडुलकरचं हे उत्तर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत आहे. सचिनच्या उत्तराखाली लोकांच्या प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे.
या कार्यक्रमादरम्यान सचिनने क्रिकेटमधील काही गोष्टी शेअर केल्या. 2008 मध्ये चेन्नईत इंग्लंडविरुद्ध खेळलेली खेळी सर्वोत्तम असल्याचं त्याने सांगितलं.
सचिनने अर्जुन तेंडुलकरच्या साखरपुड्याबाबतही स्पष्ट सांगितलं. अर्जुन आणि सानियाचा साखरपुडा झाल्याचं सांगितलं.