28 ऑगस्ट 2025
Created By: राकेश ठाकुर
कानपूर सुपरस्टार्सचा कर्णधार पुन्हा एकदा षटकार आणि चौकारांचा पाऊस पाडताना दिसला.
यूपी टी20 लीगच्या 22व्या सामन्यात समीर रिझवीने लखनौ फाल्कन्सविरुद्ध फक्त 32 चेंडूत 76 धावांची नाबाद खेळी केली.
कानपूरचा संघ 163 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत होता आणि हे लक्ष्य गाठण्यासाठी त्यांना फक्त 15.4 षटके लागली.
रिझवीने पहिल्या 15 चेंडूत फक्त 12 धावा काढल्या, पण त्यानंतर एक वादळी खेळी केली. लखनौच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं.
समीर रिझवीने पुढच्या 17 चेंडूत 9 षटकार मारले. मोठी गोष्ट म्हणजे त्याने शेवटच्या 11 चेंडूत 7 षटकार आणि 2 चौकार मारले.
समीर रिझवी यूपी टी20 लीगमध्ये धावांच्या बाबतीत नंबर 1 बनला आहे. आठ सामन्यांमध्ये 60.83 च्या सरासरीने 365 धावा केल्या.
रिझवीने एकूण 26 षटकार आणि 30 चौकार मारले आहेत आणि त्याचा स्ट्राईक रेट 160 पेक्षा जास्त आहे.