1 सप्टेंबर 2025
Created By: संजय पाटील
आशिया कप 2025 स्पर्धेसाठी संजू सॅमसनची निवड करण्यात आली. मात्र संजूला ओपनिंगची संधी मिळणार की नाही? याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
उपकर्णधार म्हणून शुबमन गिल याची टी 20i संघात एन्ट्री झाली. त्यामुळे संजूऐवजी शुबमनला ओपनिंगला संधी देण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे.
मात्र संजूने आशिया कप स्पर्धेआधी केरळ क्रिकेट लीग स्पर्धेत तोडफोड बॅटिंग करत गोलंदाजांची धुलाई केली आहे. संजूला रोखणं अशक्य झालयं.
संजूने केरळ क्रिकेट लीग स्पर्धेत कोची ब्लू टायगर्सकडून खेळताना अंतिम फेरीआधी 6 सामन्यांमधील 5 डावांत 368 धावा केल्या.
संजूने मिडल ऑर्डरपासून या स्पर्धेत बॅटिंगची सुरुवात केली. मात्र एका डावानंतर संजू सलामीला आला. संजूने त्यानंतर सलग 4 वेळा 50 पेक्षा अधिक धावा केल्या.
संजूने गेल्या 4 सामन्यांमध्ये अनुक्रमे 121, 89, 62 आणि 83 धावा केल्या आणि आशिया कप स्पर्धेसाठी ओपनर म्हणून आपला दावा आणखी मजूबत केला.
संजूने चौकार आणि षटकारांचाही पाऊस पाडला. संजूने या स्पर्धेत 30 षटकार आणि 24 चौकारही लगावले.