"..सून", शुबमनच्या नेतृत्वात भारत विजयी झाल्यानंतर साराची इंस्टा स्टोरी व्हायरल
5 ऑगस्ट 2025
Created By: संजय पाटील
सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर ही कायमच सोशल मीडियावर चर्चेचा विषय असते. सारा कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतेच.
साराने टीम इंडियाच्या पाचव्या कसोटीतील विजयानंतर इंस्टा अकाउंटवरुन एक स्टोरी पोस्ट केली. साराची ही स्टोरी खूप व्हायरल झालीय. या स्टोरीचा विजयासह संबंध नाही.
साराने इंस्टा स्टोरीत मैत्रिणींसोबतचा सेल्फी पोस्ट केला. साराने या स्टोरीला "समथिंग कमिंग सून", असं कॅप्शन दिलं. त्यामुळे चाहत्यांमध्ये सस्पेन्स वाढला आहे.
सारा लवकरच एका मोहिमेसह जोडली जाणार आहे. सारा ऑस्ट्रेलियातील पर्यटनवाढीसाठी काम करणार आहे.
साराने खूप वेळा ऑस्ट्रेलिया एक्सप्लोर केलं आहे. साराने तिच्या इंस्टा अकाउंटवर ऑस्ट्रेलियातील असंख्य पर्यटन स्थळांचे फोटो पोस्ट केले आहेत.
सारा तेंडुलकर ही एसटीएफ अर्थात सचिन तेंडुलकर फाउंडेशनची संचालिका आहे.
सारा अनेक दिवसांच्या सुट्टीनंतर भारतात परतली. साराने दुबई, स्वित्झर्लंड, इंग्लंड, फ्रान्समध्ये भ्रमंती केली.
नात्यात बेंचिंगचे नवे फॅड काय? ट्रेंडचे फायदे-तोटे जाणून घ्या