इंग्लंड दौऱ्यानंतर टीम इंडियाच्या 5 खेळाडूंवर   मोठी जबाबदारी, नक्की काय?

8 ऑगस्ट 2025

Created By:  संजय पाटील

दुलीप ट्रॉफी स्पर्धेला 26 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघातील 5 खेळाडूंची कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

दुलीप ट्रॉफी स्पर्धेत 5 वेगवेगळ्या झोनसाठी कर्णधारांची नावं जाहीर करण्यात आली आहेत.

शुबमन गिल या स्पर्धेत नॉर्थ झोनचं नेतृत्व करणार आहे. मात्र शुबमनला आगामी आशिया कप स्पर्धेमुळे संपूर्ण दुलीप ट्रॉफी करंडक स्पर्धेत खेळता येणार नाही.

टीम इंडियाचा युवा विस्फोटक फलंदाज तिलक वर्मा  याला साऊथ झोनच्या कॅप्टन्सीची जबाबदारी देण्यात आली आहे. साऊथ झोन थेट उपांत्य फेरीतील सामना खेळणार आहे.

ध्रुव जुरेल सेंट्रल झोनच्या कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणार आहे. सेंट्रल झोन आपला पहिला सामना 28 ऑगस्टला खेळणार आहे.

शार्दूल ठाकुर याच्याकडे वेस्ट झोनच्या कर्णधारपदाची धुरा आहे. वेस्ट झोनचा पहिला सामना हा 4 सप्टेंबरला होणार आहे. वेस्ट झोन थेट उपांत्य फेरीतच मैदानात उतरणार आहे. 

तर ईशान किशन याच्याकडे इस्ट झोनचं नेतृत्व देण्यात आलं आहे. इस्ट झोनचा पहिला सामना हा 28 ऑगस्टला आयोजित करण्यात आला आहे.

नात्यात बेंचिंगचे नवे फॅड काय? ट्रेंडचे फायदे-तोटे जाणून घ्या