शिखर धवनची पोस्ट  तिच्या मनाला  खूप भावली.

IPL 2024 मध्ये शिखरचा परफॉर्मन्स फार चांगला  नाहीय, मात्र तरीही त्याने  फॅन्सच मन जिंकलं.

शिखरने सोशल मीडियावर दोन फोटो पोस्ट केलेत. त्याने पंजाब किंग्सची जर्सी घातली असून त्यावर त्याच्या मुलाच नाव आहे.

शिखरने जर्सीवर आपल्या मुलाच जोरावरच नाव  लिहिलय. पुढच्या सामन्यात  तो, हे टी शर्ट घालून  मैदानात उतरु शकतो.

शिखरचा पत्नी आयशा मुखर्जीसोबत घटस्फोट झालाय. मुलगा जोरावर आईसोबत ऑस्ट्रेलियाला राहतो.

या पोस्टने प्रसिद्ध अँकर शेफाली बग्गाच्या ह्दयाला स्पर्श केला. तिने ही प्रेरणादायक पोस्ट म्हटली आहे.

जर्सीचा फोटो पोस्ट करताना धवनने लिहिलय,  तू नेहमीच माझ्यासोबत  राहशील जोरावर.

ऑस्ट्रेलियात मुलाला फक्त दोनवेळा ते सुद्धा 2-3 तासासाठी भेटता आलय,  असं शिखरने एका  मुलाखतीत सांगितलेलं