7 ऑगस्ट 2025
Created By: राकेश ठाकुर
शिखर धवन त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे कायम चर्चेत असोत. त्याने 2023 मध्ये आयशा मुखर्जीला घटस्फोट दिला. आता सोफी शाइनला डेट करत आहे.
धवनने ऑक्टोबर 2012 मध्ये आयशा मुखर्जीशी लग्न केले होते. धवनला एक मुलगा असून त्याचं नाव जोरवर असून आयशासोबत राहतो.
धवन नुकताच वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंडमध्ये खेळला. त्याला या काळात मुलाची आठवण येत होती. त्याने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट केली होती.
शिखरने लिहिलं होतं की, 'जेव्हा मी WCL मध्ये मित्रांना त्यांच्या मुलांसोबत खेळताना पाहिले तेव्हा माझ्या मनात एकच विचार आला की जोरा येथे असता तर बरं झालं असतं. तर वेगळाच आनंद असता. '
शिखरने पुढे लिहिलं की, 'मी त्याचे काही बालपणीचे फोटो पाहिले आणि अचानक त्या आठवणी जागा झाल्या. काही क्षण खरंच हृदयाच्या सर्वात जवळ असतात.'
शिखरची गर्लफ्रेंड सोफी शाइननेही या पोस्टवर प्रतिक्रिया दिली आहे. तिने कमेंटमध्ये हार्टचे इमोजी शेअर केले. ही पोस्ट क्षणात व्हायरल झाली.
घटस्फोटानंतर धवनला मुलाला भेटता येत नाही. त्याने सांगितलं होतं की, मुलाला भेटून दोन वर्षे झाली. शेवटचे बोलणे एक वर्षापूर्वी झाले होते. मला सर्वत्र ब्लॉक केले आहे.