शुबमनचा धमाका, एका शतकासह असंख्य रेकॉर्ड ब्रेक
27 जुलै 2025
Created By: संजय पाटील
भारताचा कर्णधार शुबमन गिल याने मँचेस्टरमधील चौथ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात शतक ठोकलं. शुबमनने यासह असंख्य रेकॉर्ड ब्रेक केले.
शुबमन गिल मँचेस्टरमध्ये 1990 नंतर कसोटीत शतक करणारा पहिला भारतीय ठरला. शुबमनआधी सचिन तेंडुलकरने या मैदानात शतक केलं होतं.
शुबमनचं wtc मधील हे नववं शतक ठरलं. शुबमनने यासह रोहित शर्मा याच्या wtc मधील 9 शतकांच्या विक्रमाची बरोबहरी केली.
शुबमन एका कसोटी मालिकेत 4 शतक करणारा सर डॉन ब्रॅडमॅन आणि सुनील गावसकर यांच्यानंतरचा पहिला आणि एकूण तिसरा कर्णधार ठरला.
शुबमन एका मालिकेत 4 शतकं करणारा तिसरा भारतीय आहे, त्याआधी सुनील गावसकर आणि विराट कोहली यांनी ही कामगिरी केली होती.
शुबमन मँचेस्टरमध्ये 35 वर्षांनंतर शतक करणारा पहिला भारतीय कर्णधार ठरला. याआधी 1990 साली मोहम्मद अझरुद्दीनने ही कामगिरी केली होती.
शुबमनने इंग्लंड विरुद्ध एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावांचा विक्रमही केला. शुबमनच्या नावे आतापर्यंत 4 कसोटीत 722 धावा आहेत.
नात्यात बेंचिंगचे नवे फॅड काय? ट्रेंडचे फायदे-तोटे जाणून घ्या
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा