स्मृती मंधानाच्या निशाण्यावर मोठा विक्रम, फक्त 27 धावांची गरज

28  डिसेंबर  2025

Created By:  संजय पाटील

भारत-श्रीलंका यांच्यातील चौथा टी 20i सामना 28 डिसेंबरला तिरुवनंतरपूरममध्ये आयोजित करण्यात आला आहे. या सामन्यात चाहत्यांचं स्मृती मंधानाच्या कामगिरीकडे लक्ष असणार आहे.

स्मृती आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10 हजार धावा करण्याच्या उंबरठ्यावर आहे, स्मृतीला त्यासाठी फक्त 27 धावांची गरज आहे.

स्मृती 27 धावा करताच महिला क्रिकेटमध्ये 10 हजार आंतरराष्ट्रीय धावा करणारी एकूण चौथी आणि दुसरी भारतीय फलंदाज ठरेल.

भारतासाठी माजी कर्णधार मिताली राज हीनेच अशी कामगिरी केली आहे. आता स्मृतीकडे मितालीनंतर अशी कामगिरी करणारी पहिली सक्रीय भारतीय फलंदाज होण्याची संधी आहे. 

स्मृतीने आतापर्यंत भारतासाठी 7 कसोटी, 117 वनडे आणि 156 टी 20i मध्ये 9 हजार 973 धावा केल्या आहेत.

स्मृतीला श्रीलंकेविरुद्धच्या या 5 सामन्यांच्या टी 20i मालिकेत आतापर्यंत काही खास करता आलं नाही. स्मृतीने पहिल्या 3 सामन्यांमध्ये एकूण 40 धावा केल्या आहेत.

त्यामुळे स्मृतीचा 27 धावांसह या सामन्यात कमबॅक करण्याचा प्रयत्न असणार आहे. टीम इंडिया या मालिकेत 3-0 ने आघाडीवर आहे.