28 डिसेंबर 2025
Created By: संजय पाटील
भारतीय महिला संघाने श्रीलंकेविरुद्ध विजयी तडाखा कायम ठेवला. भारताने सलग चौथा टी 20i सामना जिंकला.
भारताने तिरुवनंतरपुरममध्ये टी 20i इतिहासातील आपली सर्वोच्च 221 धावासंख्या साकारली. भारताने श्रीलंकेला 191 धावांवर रोखलं. यासह भारताने मालिकेत 4-0 ने आघाडी घेतली.
टीम इंडियाच्या या विजयासह हरमनप्रीत कौर टी 20i इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार ठरली.
हरमनप्रीत कौर हीने 131 पैकी 77 सामने जिंकले आणि ऑस्ट्रेलियाच्या मेग लँनिंग हीला पछाडलं.
तसेच स्मृती मंधाना हीने टी 20i क्रिकेटमध्ये 80 षटकार पूर्ण केले. स्मृतीने यासह हरमनप्रीत कौर हीचा 78 षटकारांचा विक्रम मोडीत काढला.
स्मृती मंधाना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10 हजार धावा करणारी एकूण चौथी तर दुसरी भारतीय फलंदाज ठरली.
स्मृती मंधाना हीने 281 डावांत ही कामगिरी केली. स्मृतीने यासह मिताली राज हीचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक केला. मितालीने 291 डावांत 10 हजार आंतरराष्ट्रीय धावा केल्या होत्या.