13 नोव्हेंबर 2025
Created By: संजय पाटील
भारतीय महिला संघाने वुमन्स वर्ल्ड कपवर नाव कोरलं. तेव्हापासून स्मृती मंधाना चर्चेत आहे.
स्मृती मंधाना हीने वूमन्स वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियासाठी सर्वाधिक धावा केल्या.
वर्ल्ड कप विजयानंतर आता चाहत्यांना पलाश मुच्छल आणि स्मृतीच्या लग्नाची प्रतिक्षा आहे.
स्मृती आणि पलाश या दोघांच्या लग्नाची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे या दोघांच्या लग्नाच्या तारखेची चाहत्यांना प्रतिक्षा आहे.
स्मृती पलाश आणि त्याची बहीण गायिका पलक मुच्छल यांच्या तुलनेत फेमस आहे, यात वाद नाही.
स्मृतीचे इंस्टाग्रामवर 13.5 मिलियन फॉलोअर्स आहेत. स्मृतीच्या फॉलोअर्सची संख्या ही पलक आणि पलाशच्या तुलनेत कित्येक पटीने जास्त आहे.
पलकचे इंस्टाग्रामवर 6.4 तर पलाशचे 2.1 मिलियन फॉलोअर्स आहेत.