17 ऑगस्ट 2025
Created By: संजय पाटील
दक्षिण आफ्रिकेचा युवा फलंदाज डेवाल्ड ब्रेव्हीस याच्यासाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील टी 20i मालिका अविस्मरणीय ठरली. डेवाल्डने या मालिकेत विराट कोहलीचा रेकॉर्ड ब्रेक केला.
डेवाल्डने 3 सामन्यांच्या टी 20i मालिकेत 180 धावा केल्या. डेवाल्डने या दरम्यान 1 शतक आणि 1 अर्धशतक ठोकलं.
डेवाल्डने या मालिकेतील 3 सामन्यांमध्ये एकूण 14 षटकार लगावले. डेवाल्ड यासह ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलिया विरुद्ध टी 20i सीरिजमध्ये सर्वात जास्त सिक्स ठोकणारा फलंदाज ठरला.
डेवाल्डआधी हा विक्रम विराटच्या नावावर होता. विराटने ऑस्ट्रेलिया विरुद्ध ऑस्ट्रेलियात 11 टी 20i सामन्यांमध्ये 12 षटकार लगावले होते.
विराट आणि डेवाल्ड या दोघांव्यतिरिक्त कोणताही फलंदाज ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलिया विरुद्ध टी 20i मालिकेत 10 किंवा त्यापेक्षा अधिक सिक्स लगावू शकला नाही.
विराटने टी 20i कारकीर्दीत ऑस्ट्रेलिया विरुद्ध ऑस्ट्रेलियात 11 सामन्यांमध्ये एकूण 451 धावा केल्या होत्या. विराट या यादीत पहिल्या स्थानी आहे.
आता डेवाल्डला विराटचा हा विक्रम मोडण्याची संधी आहे. मात्र डेवाल्डला यासाठी पुढील ऑस्ट्रेलिया दौऱ्याची वाट पाहावी लागेल.