स्टीव्ह स्मिथला ऑस्ट्रेलियाच्या टी20 संघात हवंय स्थान, कारण...

15 ऑगस्ट 2025

Created By:  राकेश ठाकुर

ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू स्टीव्ह स्मिथने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी संपल्यानंतर वनडे क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.

स्मिथ कसोटी आणि टी20 मध्ये खेळत आहे. पण स्टीव्ह स्मिथला ऑस्ट्रेलियन संघाच्या टी20 संघात स्थान मिळवणं कठीण आहे. 

स्मिथचे एक मोठे विधान केलं आहे. त्याने लॉस एंजेलिसमध्ये होणाऱ्या 2028 च्या ऑलिंपिक खेळात खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

स्काय स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीत स्टीव्ह स्मिथ म्हणाला की, 2028 मध्ये ऑलिंपिक संघात स्थान मिळवणे हे माझे लक्ष्य आहे. 

मला माहिती आहे की ऑस्ट्रेलियन टी20 संघ सध्या खूप चांगली कामगिरी करत आहे. त्यात स्थान मिळवणे माझ्यासाठी कठीण आहे. पण मी सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करत राहीन.

2028 मध्ये ऑलिंपिक स्पर्धेला अजून 3 वर्षांचा अवधी शिल्लक आहे तोपर्यंत स्टीव्ह स्मिथ 39 वर्षांचा असेल.

क्रिकेट ऑलिंपिकमध्ये यापूर्वी 128 वर्षापूर्वी खेळला गेला होता. प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर पुन्हा त्याचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

Diamond League 2025: सुपरस्टार नीरज चोप्रा स्पर्धेत सहभागी होणार नाही, कारण...