सुरेश रैना अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय, नक्की काय केलं होतं?

27 नोव्हेंबर  2025

Created By:  संजय पाटील

टीम इंडियाचा माजी ऑलराउंडर सुरेश रैनाला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होऊन बरेच वर्ष झालेत. मात्र तो कायम चर्चेत असतो.

सुरेश रैना 27 नोव्हेंबरला 39 वर्षांचा झाला. रैनाचा मोठा चाहता वर्ग आहे.

रैनाने 13 वर्षांच्या कारकीर्दीत अनेकदा भारताला जिंकवलं. रैना 2011 वनडे वर्ल्ड कप आणि 2013 चॅम्पियन्स ट्रॉफी विजेत्या संघाचा भाग होता. 

रैनाने आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत अनेक विक्रम केले. मात्र रैनाने असा एक रेकॉर्ड केला होता जो त्याच्याआधी कोणत्याही भारतीयाला जमला नाही.

रैना तिन्ही फॉर्मेटमध्ये शतक करणारा पहिला भारतीय फलंदाज होता. रैनाने कसोटीत शतक झळकावत ही विशेष कामगिरी केली होती.

रैनाने 2008 साली एकदिवसीय शतक केलं होतं. त्यानंतर मे 2010 मध्ये टी 20i शतक झळकावलं. त्यानंतर डावखुऱ्या फलंदाजाने जुलै 2010 साली कसोटी शतक पूर्ण केलं.

तसेच रैनाने चेन्नईला 4 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख भूमिका बजावली होती. रैनाला मिस्टर आयपीएल असं म्हटलं जातं.