रिस्पेक्ट प्लस, सूर्यकुमारची  जडेजासाठी खास स्टोरी

14 जुलै 2025

Created By:  संजय पाटील

टीम इंडियाचा टी 20I  कॅप्टन सूर्यकुमार यादवची ऑलराउंडर रवींद्र जडेजासाठी खास इंस्टा स्टोरी

रवींद्र जडेजाने इंग्लंड विरूद्धच्या तिसऱ्या कसोटीत झुंजार खेळी केली.

जडेजाने इंग्लंड विरुद्ध 193 धावांचा पाठलाग करताना नाबाद अर्धशतक झळकावलं

जडेजाने 181 बॉलमध्ये 1 सिक्स आणि 4 फोरसह नॉट आऊट 61 रन्स केल्या.

जडेजाचं हे सलग चौथं कसोटी अर्धशतक ठरलं, जडेजाने याआधी दुसऱ्या कसोटीतील दोन्ही डावात आणि तिसऱ्या सामन्यातील पहिल्या डावात अर्धशतक ठोकलं.

जडेजाने भारताला विजय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला. मात्र त्याला दुसऱ्या बाजूने साथ मिळाली नाही. 

सूर्याने जडेजाच्या या खेळीच्या आलेखाचा फोटो इंस्टा स्टोरीतून 'रिस्पेक्ट प्लस' या कॅप्शननसह पोस्ट केला आहे.

हातात कवड्यांचं ब्रेसलेट घातल्याने काय होतं? जाणून घ्या

हातात कवड्यांचं ब्रेसलेट घातल्याने काय होतं? जाणून घ्या