"मी विराटला.., कोहलीसोबतच्या रिलेशनच्या चर्चेबाबत तमन्ना भाटीयाने स्पष्टच सांगितलं

3 ऑगस्ट 2025

Created By:  संजय पाटील

बॉलिवूड आणि दाक्षिणात्य अभिनेत्री तमन्ना भाटीया हीने आतापर्यंत अनेक सिनेमांमधून चाहत्यांचं मनोरंजन केलंय

तमन्ना प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफमुळे कायमच चर्चेत असते.

तमन्ना अभिनेता विजय वर्माला डेट करत असल्याची चर्चा होती.  मात्र दोघे त्यानंतर वेगळे झाले, असंही म्हटलं गेलं.  त्याआधीही तमन्नाचं अनेक स्टारसह नाव जोडलं गेलं होतं.

तमन्नाचं नाव टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर विराट कोहली याच्यासोबतही जोडलं गेलं होतं.

तमन्नाला एका कार्यक्रमात डेटिंगबाबत प्रश्न करण्यात आला. तसेच मोठ्या पडद्यावर अभिनेत्रीचा विराटसोबतचा फोटो दाखवण्यात आला.

"मी विराटला टीव्ही जाहीरातीनिमित्ताने एकदाच भेटले.  विराटलाही डेटिंगच्या अफवांबाबत ऐकून हसू आलं असेल", असं तमन्नाने म्हटलं.

विराट आणि तमन्नाची भेट 2010 मध्ये Ad Show दरम्यान झालेली.  तेव्हा दोघेही एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा होती.

नात्यात बेंचिंगचे नवे फॅड काय? ट्रेंडचे फायदे-तोटे जाणून घ्या