रवींद्र जडेजाची ऐतिहासिक कामगिरी, इंग्लंडमध्ये ठोकल्या 500 धावा, सचिन तेंडुलकरला पछाडलं

2 ऑगस्ट 2025

Created By:  संजय पाटील

भारताचा अनुभवी स्टार ऑलराउंडर रवींद्र जडेजा याने इंग्लंड दौऱ्यात धावांचा पाऊस पाडला आहे.

रवींद्र जडेजा याने इंग्लंड दौऱ्यात उल्लेखनीय कामगिरी करत बॅटिंगने धमाका केला आणि धावांचा डोंगर उभा केला. 

जडेजाने ओव्हलमधील पाचव्या कसोटीत भारताच्या दुसऱ्या डावात चाबूक अर्धशतक ठोकलं.

जडेजाने 53 धावा केल्या. जडेजाची हे या मालिकेतील पाचवं अर्धशतक ठरलं. जडेजाने त्या व्यतिरिक्त 1 शतकही झळकावलं.

जडेजाने अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी टेस्ट सीरिजमधील 10 डावांत 86 च्या सरासरीने एकूण 516 धावा केल्या.

विशेष म्हणजे माजी दिग्गज सचिन तेंडुलकर याला कसोटी कारकीर्दीत एकदाही कसोटी मालिकेत 500 धावा करता आल्या नाहीत.

जडेजा इंग्लंड-इंडिया कसोटी मालिकेत 500 धावा करणारा एकूण आणि तिसराच भारतीय ठरला. याआधी कर्णधार शुबमन गिल आणि केएल राहुल या दोघांनी ही कामगिरी केली.

नात्यात बेंचिंगचे नवे फॅड काय? ट्रेंडचे फायदे-तोटे जाणून घ्या