आशिया कपमध्ये बुमराह म्हणजे भारत जिंकणारच;14 तारखेला 14 वा विजय!

31 ऑगस्ट 2025

Created By:  संजय पाटील

क्रिकेट चाहत्यांना आशिया कप स्पर्धेत 14 सप्टेंबरला होणाऱ्या भारत-पाक सामन्याची प्रतिक्षा आहे.  सामन्यात बुमराहच्या कामगिरीकडे लक्ष असणार आहे.

जसप्रीत बुमराह याने आतापर्यंत अनेक सामन्यांमध्ये चिवट बॉलिंग केलीय. त्या व्यतिरिक्त आणखी एका खास रेकॉर्डमुळे बुमराहकडे लक्ष असणार आहे.

बुमराहचा या स्पर्धेतील ट्रॅक रेकॉर्ड पाहिल्यास  14 सप्टेंबरला 14 वा  तर 10 सप्टेंबरला यूएई विरुद्धच्या सामन्यात 13 वा विजय होणार हे निश्चित आहे, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.

टीम इंडिया प्रत्येक स्पर्धेत पाकिस्तानवर वरचढ ठरली आहे. त्यामुळे टीम इंडिया यावेळेसही जिंकेल, असा विश्वास चाहत्यांना आहे.

उल्लेखनीय बाब अशी की बुमराह प्लेइंग ईलेव्हनमध्ये असताना टीम इंडियाचा आशिया कप स्पर्धेत एकदाही पराभव झालेला नाही. 

त्यामुळे आशिया कप स्पर्धेत जसप्रीत बुमराह याचा हा रेकॉर्ड कायम राहणार की ब्रेक होणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 

आशिया कप स्पर्धेत सूर्यकुमार यादव भारताचं नेतृत्व करणार आहे. सूर्याची आशिया कप स्पर्धेत नेतृत्व करण्याची ही पहिलीच वेळ ठरणार आहे.

आशिया कप पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक निर्धाव चेंडू टाकणारे गोलंदाज